Tuesday, April 20, 2010

Flashback !!!

भविष्याचा विचार करून काय फायदा जर ते बदलणार नसेल...आणि वर्तमनाचा विचार करून विधिलिखित सत्याला कशाला challenge करायचे उगाचच !!! आपले flashback मधे मस्त वाटते जगायला.... rewind करा किती speed ने , हवे तिथे pause करा न वाटेल ते play करा....छान वाटते जुन्या गोष्टी आठवायला, कळत नकळत केलेल्या चुकांवर आपणहून हसायला, चुकत राहावे, हसत राहावे...अन् जगत रहाव्यात आठवणी... ओंझळीत धरून ठेवलेल्या, गाठोड्यात बांधून आणलेल्या, मनामधे खोलवर जपलेल्या, तुडुंब भरलेल्या डोळ्यांमधून सांडू न दिलेल्या...आठवणी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या .... आठवणी पाटी, pensil अन दप्तराच्या....आठवणी आईच्या रागावण्याच्या...आठवणी बाबांच्या प्रेमाच्या....आठवणी college च्या धुंद दिवसांच्या ...आठवणी result न आलेल्या practcals च्या ... आठवणी चोरून पाहिलेल्या picture च्या ....आठवणी bunk केलेल्या lectures च्या ....आठवणी airtell तो airtell १० paise calling च्या ....आठवणी १० वाजायची वाट पहिल्याच्या ....आठवणी कट्ट्यावरच्या हसण्याच्या, रुसण्याच्या, मैत्रीच्या, अन विनाकारण भांडणाच्या...आठवणी पावसाळ्यातल्या कवितांच्या ... आठवणी morning walk अन रात्रीच्या चंद्राच्या ...आठवत राहावे अन जगत राहावे !!!

4 comments:

  1. "आठवणी ख-या अर्थाने जगलेल्या त्या क्षणांच्या आणि त्यांनी दिलेल्या अनमोल ठेव्याच्या...!"

    अप्रतिम लिहिलं आहेस...

    ReplyDelete
  2. आठवणी morning walk अन रात्रीच्या चंद्राच्या ...आठवत राहावे अन जगत राहावे !!!

    ReplyDelete
  3. rewind करा किती speed ने , हवे तिथे pause करा

    हेच नेमके नाही जमत ...
    कुठली आठवण कुठे घेऊन जाईल सांगताच येत नाही ...
    flashback मधे गेलो कि सगळे काही अनियंत्रित ..

    post छान आहे ...

    ReplyDelete
  4. आठवणी- shewti pratyek kshan athawanitach rupantarit hotat..!! japun banawayla hawyat..!! :) :)

    ReplyDelete