Wednesday, February 10, 2010

तुला आठवते का ....

दिवस कसे उडून जातात ना
क्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...

आपण मारलेल्या गप्पा ,
आपण गायलेली गाणी ,
डूबताना आपणच पहायचो ना सूर्य
रोज कातरवेळी ...

त्या पायऱ्या ज्यांच्यावर बसून आपण भविष्याची स्वप्न रंगवायचो ,
आणि कितीही नाही म्हणले तरी जगाचे भान विसरायचो ...

तेंव्हा नव्हते वाटले कधीच
भविष्य इतके वेगले असेल
सगळे जवळ असुनही
तुझी क्षणोंक्षणी उणीव भासेल ...

त्याच आठवणी मग आधार देतात
आपल्या आपल्या होउन
आणि मी मनाची समजुत घालते ,
पुन्हा काहीतरी आठवून ...

7 comments:

  1. mast.khupch mast.It's realistic.keep it up!!

    ReplyDelete
  2. manala premachi zuluk lagte.............. hya kavite muley

    Kharach asech manache bhav kavitie utrwat jaaaaaaaaa khupch sunder rekhatli aahe kavita

    Keeep up the spirit!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  3. Khup mast g..Mala shabdach nahi suchle ki kay lihu tuzya ya itkya chhan creation sathi!

    Athavle sagle te kshan, onjalit bharun gheta gheta nakalat nistun gelele...!

    ReplyDelete
  4. माझे एक मत आहे, शब्दांची जूळवा-जूळव हे कारण मुळीच नाहीये कोणाचे लिहिलेले आवडण्यासाठी. कारण असते ते अनुभव, जेव्हा ती गोष्ट आपण अनुभवतो; वाचता-वाचता प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून पळु लागतात. तेव्हा आपण गालात हळूच हसतो, आणि शब्द फुटतो "व्वा!!"

    ReplyDelete
  5. simply great....one can go back and jussss recall...tya tinhi sanja chya athavani tya prahari...kitida aalo.... gelo

    ReplyDelete
  6. दिवस कसे उडून जातात ना
    क्षणात परके होउन
    आठवनी मात्र ताज्या रहातात
    मनात आपल्याच होउन ...

    faar chhan

    ReplyDelete