Wednesday, February 10, 2010

तुला आठवते का ....

दिवस कसे उडून जातात ना
क्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...

आपण मारलेल्या गप्पा ,
आपण गायलेली गाणी ,
डूबताना आपणच पहायचो ना सूर्य
रोज कातरवेळी ...

त्या पायऱ्या ज्यांच्यावर बसून आपण भविष्याची स्वप्न रंगवायचो ,
आणि कितीही नाही म्हणले तरी जगाचे भान विसरायचो ...

तेंव्हा नव्हते वाटले कधीच
भविष्य इतके वेगले असेल
सगळे जवळ असुनही
तुझी क्षणोंक्षणी उणीव भासेल ...

त्याच आठवणी मग आधार देतात
आपल्या आपल्या होउन
आणि मी मनाची समजुत घालते ,
पुन्हा काहीतरी आठवून ...