Saturday, June 19, 2010

अन भरकटलेले शब्द फेर धरून नाचतात

सोनेरी किरणं दवात अलगद भिजतात
हळूच कुठंतरी मनामध्ये पैजण वाजतात
अन भरकटलेले शब्द फेर धरून नाचतात


गार गार जरा जरा पिंगणारा वारा
रिमझिम सरींसाठी आसुसलेली धरा
रानामध्ये मोर जेंव्हा एका सुरात गातात
तेंव्हा भरकटलेले शब्द फेर धरून नाचतात


ढगांच्या गर्दीतून वाट काढत विजा चमकतात
आणि काळा कुट्ट अंधार क्षणभर पळवून लावतात
अंगणामध्ये थेंब जेंव्हा तळ होऊन साचतात
भरकटलेले शब्द तेंव्हा फेर धरून नाचतात

1 comment:

  1. भरकटलेले शब्द तेंव्हा फेर धरून नाचतात

    chhhan kavita aahe aawadali ...

    ReplyDelete