Friday, January 07, 2011

रोज नवा अनुभव...

रोज ची सकाळ नव्या रुपानं उगवायला लागते आणि रटाळ असणारं जीवन  अचानक आवडायला लागतं
नेहमीचा रस्ता अन बस ची वाट पाहणं जेंव्हा नित्य नवा अनुभव वाटायला लागतो आणि ऑफिस चे काम facebooking  वाटायला लागतं 
तेंव्हा , 
आपण आपल्या  एकुलत्या एका आयुष्याला रेटायचं सोडून त्याला न्याय द्यायला सुरुवात करत असतो.
आणि आज चे क्षण जे उद्याच्या रंगीत आठवणी होऊ पहात आहेत ते आपण  alarm ला snooze करण्यात , सकाळी सकाळी कटकट करण्यात, bus , गर्दी, प्रवास, office ,  boss , manager , team ,colleagues , chair , desk , coffee ला शिव्या देण्यात घालवत होतो त्यांना जगायचा एक मोका आता देत आहोत. 
असे जगावेत  ते क्षण कि त्यांनीही म्हणावं ज्याच्याकड  गेलो होतो आयुष्य शिकवायला तोच मला शिकवून गेला  जीवन जगायला :)

सावल्या ...

सावल्यांमध्ये कधी-कधी मग तुझं चेहरा दिसतो ...मागे वळून बघितलं तर  तिथं  तू नसतो ...एक छोटीशी पायवाट वळणं-वळणं घेत एकटीच चाललेली असते ...खूप दूर नजर गेल्यावर तुझ्यापर्यंत नाही आपल्यापर्यंत पोहोचलेली दिसते ...कदाचित तुझ्या सावली पासून तुझ्या असण्यापर्यंत  जोडलेली ...आठवते मग वाट दुसरी आपल्या पायवाटेला फुटलेली ...अन तुझी साथ माझ्या हातातून सुटलेली ...खूप अंतर काटले मी आता एकटं-एकटं चालून ..आणि प्रत्येक पावलावर तुझे रूप सावल्यांमध्ये पाहून ...

Monday, December 06, 2010

सहज सुचलं म्हणून...

माझा "आज" चा भरपूर वेळ "काल" च्या आठवणी जगण्यात आणि "उद्या"चे स्वप्न रंगवण्यात जातो... त्यातही एक मजा असते...वेळ वाया जातोय असे मला कधीच वाटत नाही ... आठवणींची शिदोरी आणि स्वप्नांची साथ खूप महत्वाची असते ..पावलो पावली दुसर्यांच्या जगाशी लढण्यासाठी आणि स्वतःचे जग बांधण्यासाठी ...नवीन रस्ते नव्या वाटा शोधण्यासाठी...त्या वाटेतले  अडथळे दूर करण्यासाठी... हवे ते मिळवण्यासाठी... आणि मिळाल्यावर पुन्हा एकदा नवीन स्वप्न पाहून ते पूर्ण करायला झगडण्यासाठी... 

Saturday, June 19, 2010

अन भरकटलेले शब्द फेर धरून नाचतात

सोनेरी किरणं दवात अलगद भिजतात
हळूच कुठंतरी मनामध्ये पैजण वाजतात
अन भरकटलेले शब्द फेर धरून नाचतात


गार गार जरा जरा पिंगणारा वारा
रिमझिम सरींसाठी आसुसलेली धरा
रानामध्ये मोर जेंव्हा एका सुरात गातात
तेंव्हा भरकटलेले शब्द फेर धरून नाचतात


ढगांच्या गर्दीतून वाट काढत विजा चमकतात
आणि काळा कुट्ट अंधार क्षणभर पळवून लावतात
अंगणामध्ये थेंब जेंव्हा तळ होऊन साचतात
भरकटलेले शब्द तेंव्हा फेर धरून नाचतात

Tuesday, April 20, 2010

Flashback !!!

भविष्याचा विचार करून काय फायदा जर ते बदलणार नसेल...आणि वर्तमनाचा विचार करून विधिलिखित सत्याला कशाला challenge करायचे उगाचच !!! आपले flashback मधे मस्त वाटते जगायला.... rewind करा किती speed ने , हवे तिथे pause करा न वाटेल ते play करा....छान वाटते जुन्या गोष्टी आठवायला, कळत नकळत केलेल्या चुकांवर आपणहून हसायला, चुकत राहावे, हसत राहावे...अन् जगत रहाव्यात आठवणी... ओंझळीत धरून ठेवलेल्या, गाठोड्यात बांधून आणलेल्या, मनामधे खोलवर जपलेल्या, तुडुंब भरलेल्या डोळ्यांमधून सांडू न दिलेल्या...आठवणी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या .... आठवणी पाटी, pensil अन दप्तराच्या....आठवणी आईच्या रागावण्याच्या...आठवणी बाबांच्या प्रेमाच्या....आठवणी college च्या धुंद दिवसांच्या ...आठवणी result न आलेल्या practcals च्या ... आठवणी चोरून पाहिलेल्या picture च्या ....आठवणी bunk केलेल्या lectures च्या ....आठवणी airtell तो airtell १० paise calling च्या ....आठवणी १० वाजायची वाट पहिल्याच्या ....आठवणी कट्ट्यावरच्या हसण्याच्या, रुसण्याच्या, मैत्रीच्या, अन विनाकारण भांडणाच्या...आठवणी पावसाळ्यातल्या कवितांच्या ... आठवणी morning walk अन रात्रीच्या चंद्राच्या ...आठवत राहावे अन जगत राहावे !!!

Wednesday, February 10, 2010

तुला आठवते का ....

दिवस कसे उडून जातात ना
क्षणात परके होउन
आठवनी मात्र ताज्या रहातात
मनात आपल्याच होउन ...

आपण मारलेल्या गप्पा ,
आपण गायलेली गाणी ,
डूबताना आपणच पहायचो ना सूर्य
रोज कातरवेळी ...

त्या पायऱ्या ज्यांच्यावर बसून आपण भविष्याची स्वप्न रंगवायचो ,
आणि कितीही नाही म्हणले तरी जगाचे भान विसरायचो ...

तेंव्हा नव्हते वाटले कधीच
भविष्य इतके वेगले असेल
सगळे जवळ असुनही
तुझी क्षणोंक्षणी उणीव भासेल ...

त्याच आठवणी मग आधार देतात
आपल्या आपल्या होउन
आणि मी मनाची समजुत घालते ,
पुन्हा काहीतरी आठवून ...

Monday, January 25, 2010

मी आणि माझा पाउस ...२३ जानेवारी २००८

मला आवडतो पाउस ... खरच ... खुप आवडतो ...
पाउस नाव जरी ऐकले तरी मन सैरभैर व्हायला लागते ...
आणि पावसाळा म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच ...
काय करू आणि काय नाही असे वाटते पाउस पडत असताना ...
हृदयाचे ठोके अगणित वेगाने वाढायला लागतात ...
मनातले विचार मैलो मैल दूर दूर वाहवत जातात ...
का होते, कसे होते मला नाही माहित ...
पण असहाय्य मानसा सारखी काहीच करू नाही शकत ...
नंतर त्या पावसाच्या सरिंकडे एकटक पहात बसण्याचा माझा वेडेपणा ...
सगळे जग त्या क्षणाला थांबावे आणि मी त्या कोसळणाऱ्या थेंबांना नजरेत कैद करत जावे ...

पाउस... बेचैन करणारा ... विचारांचे उधाण आणणारा ...
त्या क्षणाला माझ्या आयुष्यात उलथा पालथ करणारा ...
भुत, वर्त्तमान, भविष्याचा विसर पडणारा ...
स्वप्नांच्या , कल्पनेच्या जगात नेणारा ...

पाउस ...माझे सारे दू:ख पळवून लावणारा ...
मी केलेल्या चूका समजुन घेणारा ...
माझे अश्रु हळूच टिपणारा ...
जगापुढे माझे हसू न होवू देणारा ...
'तू माझी आणि मी तुझा ' हळूच कानात सांगणारा ...

मी आणि माझा पाउस ...
तो असताना मला कोणीच नको असते ...माझे जग ...माझे सर्वस्व म्हणजे तो असतो ....
मी वाट पहाते, धग दाटून येण्याची ...काळोख पसरण्याची ...
वाट पहाटे मी ढगांच्या गड गडाटाची ...विजांच्या कडकडाटाची ...
वाट पहाते मी पावसाचे थेंब थेंब डोळ्यात साठवण्याची ...
सरी वर सरी अंगावर झेलण्याची ....
वाट पहाते मी त्याच्या आवेशात चिंब चिंब भिजण्याची ....