Thursday, January 21, 2010

ती कविता...

ती कविता कधी पूर्णच नाही झाली ....
कारण ,
माझ्या कवी मनाला परत कधी जागच नाही आली ....
आता ते शब्दही थकलेत एका जगी राहून ....
अणि ओळही थकलिये दुसरिची वाट पाहून ....
ओळ अशी होती ...."तू फ़क्त शब्द दे "
ती सुचली तेंव्हा मी खुप सुखावले ....
कविता पूर्ण करण्यासाठी जंग जंग पछाडले ...
पण ठरवून असे शब्द कधी सुचतात का ???
रखरखत्या उन्हात कधी धग फुटतात का ???
अशेच दिवस सरत गेले ....
अणि मी, शब्द भूतकाळात विसरत गेले ....
म्हणून माझ्या कवी मनाला कधी जागच आली नाही ....
आणि ती कविता कधी पूर्णच झाली नाही ...

5 comments:

  1. ते शब्द जरी भुतकाळात हरवले, तरी त्या शब्दांनी आपले आठवणीतले क्षण मात्र फुलवले..हो ना?
    I still remember that bench, those words & we two sitting there for hours trying to search the next line..

    ReplyDelete
  2. @ Anu: anu shevatparyant aplyala nahi sapdli pudhachi ool...parat jave lagel tya bench var basayla.....

    ReplyDelete
  3. अशेच दिवस सरत गेले ....
    अणि मी, शब्द भूतकाळात विसरत गेले ....
    म्हणून माझ्या कवी मनाला कधी जागच आली नाही ....
    आणि ती कविता कधी पूर्णच झाली नाही ...
    Sundar..

    ReplyDelete